लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! जानेवारी महिन्याचे ₹1500 या दिवशी खात्यात जमा होणार? जाणून घ्या सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अनेक दिवसांपासून महिलांच्या मनात एकच प्रश्न होता “जानेवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार?” आता या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

डिसेंबर महिन्याचा हप्ता मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर उशिराने देण्यात आला होता. त्यामुळे जानेवारीचा हप्ता देखील उशिरा मिळणार की काय, अशी भीती अनेक लाडक्या बहिणींना वाटत होती. मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीआधीच जानेवारीचे ₹1500 खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झेडपी निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता वेळेत देण्याच्या तयारीत आहे. Ladki Bahin Yojana

याआधी महापालिका निवडणुकीच्या अगदी एक दिवस आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. त्याच धर्तीवर आता झेडपी निवडणुकीआधी हा हप्ता देण्यात येऊ शकतो. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी प्रशासनाची हालचाल पाहता महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही लाडक्या बहिणींना मात्र मिळणार नाही ₹1500

या योजनेत सर्वांनाच पैसे मिळतील, असं नाही. राज्य सरकारने केवायसी (KYC) बंधनकारक केल्यामुळे अनेक महिलांचा हप्ता अडचणीत आला आहे.

  • ज्या महिलांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही,
  • ज्या महिला योजनेच्या उत्पन्न निकषात बसत नाहीत,
  • तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे,

अशा महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे, काही महिलांना डिसेंबर महिन्याचाच हप्ता मिळालेला नाही. अशा महिलांना पुढील हप्ताही मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. केवायसीनंतरही लाभार्थ्यांची थेट पडताळणी केली जात असल्याने अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे.

महिलांनी काय काळजी घ्यावी?

लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमितपणे मिळावा यासाठी महिलांनी –

  • ✔ आपली केवायसी पूर्ण आहे की नाही, हे तपासावे
  • ✔ बँक खाते आधारशी लिंक आहे का, याची खात्री करावी
  • ✔ उत्पन्न व इतर कागदपत्रे योग्य आहेत का, हे पाहावे

ही काळजी घेतल्यास हप्ता थांबण्याचा धोका टाळता येऊ शकतो.

महागाईच्या काळात ₹1500 ही रक्कम अनेक घरांसाठी मोठा आधार ठरत आहे. स्वयंपाकघराचा खर्च, मुलांचं शिक्षण, औषधपाणी या सगळ्यासाठी लाडकी बहीण योजना महिलांच्या उपयोगी पडत आहे. आता फक्त सर्व महिलांच्या नजरा जानेवारीच्या हप्त्याकडे लागल्या आहेत. सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला का? डिसेंबरचा हप्ता अडकला आहे का?

अशा ताज्या अपडेटसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!