Today’s Horoscope | आज रविवार, १८ जानेवारी २०२६. सूर्यदेवाची कृपा मिळवण्याचा दिवस! पण लक्षात ठेवा, आज फक्त रविवारच नाही, तर आज ‘पौष अमावस्या’ सुद्धा आहे. शास्त्रात अमावस्येच्या दिवसाला एक वेगळं महत्त्व असतं. आजचा दिवस काही राशींसाठी सुखाची बातमी घेऊन येईल, तर काहींना मात्र पावलोपावली जपून राहावं लागणार आहे. ग्रहांच्या या खेळात तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? चला पाहूया Today’s Horoscope
मेष (Aries):
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि एखादं मोठं ‘कॉन्ट्रॅक्ट’ तुमच्या पदरात पडू शकतं. फक्त एकच करा, नकारात्मक लोकांपासून चार हात लांब राहा.
वृषभ (Taurus):
कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी आजचा दिवस अगदी योग्य आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. पण लक्षात ठेवा, कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका.
मिथुन (Gemini):
तुमच्या मेहनतीचं चीज होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. आज रविवार असल्याने मुलांसोबत छान वेळ जाईल. एखादी धार्मिक यात्रा घडण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer):
घरातील मोठ्या माणसांचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर काळजी कशाला? जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. संध्याकाळी जोडीदाराला एखादं खास गिफ्ट देऊन खुश करायला हरकत नाही.
सिंह (Leo):
आज तुम्ही खूप धावपळ करणार आहात. कामाच्या निमित्ताने प्रवास घडेल, पण यातून मोठे फायदेही होतील. व्यवसायात मोठ्या लोकांची मदत मिळाल्याने तुमचं काम सोपं होईल.
कन्या (Virgo):
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेलं काम आज पूर्णत्वास जाईल. तुमच्यात असलेल्या सुप्त गुणांचं आज लोक कौतुक करतील. प्रगतीचे संकेत मिळत आहेत, फक्त संधीचं सोनं करा.
तूळ (Libra):
आजचा दिवस ‘ना नफा ना तोटा’ असा असेल. पण तुमच्या कामामुळे इतरांना फायदा होणार आहे. व्यवहारात स्वतःचा विचार करताना इतरांनाही सोबत घेऊन चाला, नक्कीच यश मिळेल.
वृश्चिक (Scorpio):
सकाळची सुरुवात तर गोड होईल, पण सावध राहा! दुपारनंतर काही अडचणी येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास थोडा डगमगू शकतो, पण खचून जाऊ नका. संयम ठेवा.
धनु (Sagittarius):
आळस झटकून कामाला लागा, कारण आज यश तुमच्या दारी आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि लवकरच एखादी आनंदाची बातमी कानावर पडेल.
मकर (Capricorn):
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक आहे. शेअर बाजारात किंवा कुठेही गुंतवणूक करण्याच्या फंदात पडू नका, धनहानी होण्याची दाट शक्यता आहे. खिसा सांभाळून!
कुंभ (Aquarius):
आज मन थोडं द्विधा मनस्थितीत असेल. डोक्यात विचार खूप असतील पण मार्ग सापडणार नाही. थोडा वेळ शांत बसा आणि डोकं शांत ठेवा, गोंधळून जाऊ नका.
मीन (Pisces):
आर्थिक बाबतीत दिवस चांगला असला तरी उधळपट्टी टाळा. महिन्याचा शेवट जवळ येत आहे, त्यामुळे खर्चावर ताबा ठेवा. वैवाहिक जीवनातील कटकटी आज दूर होतील.