PM Kisan Scheme Update 2026 | नवीन वर्षाची सुरुवात बळीराजासाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरणार असे चित्र सध्या दिसत आहे. कडाक्याची थंडी आणि शेतीकामांची लगबग सुरू असतानाच, आता केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या पैशांची शेतकरी चातकासारखी वाट पाहत होते, ते पैसे आता लवकरच खात्यात जमा होणार असल्याची चिन्हे आहेत.PM Kisan Scheme Update 2026
२२ व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार!
पीएम किसान योजना ही आता केवळ कागदावरची योजना राहिलेली नाही, तर ती ग्रामीण भागातील लाखो शेतकरी कुटुंबांचा आर्थिक कणा बनली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते यशस्वीरीत्या जमा झाले आहेत. नियमानुसार, वर्षाचा शेवटचा हप्ता डिसेंबर ते मार्च या दरम्यान दिला जातो. नोव्हेंबरमध्ये २१ वा हप्ता मिळाल्यानंतर, आता २२ वा हप्ता मार्च २०२६ च्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. खते आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी ऐनवेळी लागणाऱ्या पैशांची चिंता यामुळे मिटणार आहे.
बजेटमध्ये होणार मोठी घोषणा?
यावेळी नुसता हप्ताच नाही, तर ‘बोनस’ आनंदाची बातमी मिळण्याचीही चर्चा आहे. येत्या १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. सध्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळतात, पण वाढती महागाई आणि शेतीचा खर्च पाहता ही रक्कम वाढवून ८ ते १० हजार रुपये केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘सुगीचे दिवस’ घेऊन येईल.
पण… एक चूक नडली तर पैसे अडकणार!
अनेक शेतकरी तक्रार करतात की, हप्ता जाहीर होऊनही त्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण नसणे. सरकारने आता हे बंधनकारक केले आहे. जर तुमची ही प्रक्रिया अपूर्ण असेल, तर तुमचा हप्ता बँकेच्या दारात येऊनही अडकू शकतो.
घरबसल्या ई-केवायसी कशी करावी?
तुम्हाला कुठेही रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर:
१. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर (pmkisan.gov.in) जा.
२. ‘e-KYC’ या पर्यायावर क्लिक करा.
३. तुमचा आधार नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला ओटीपी भरा.
बस, एवढं केलंत की तुमचं काम फत्ते झालं आणि तुमचा हप्ता सुरक्षित झाला!