​टाटाने खेळली मोठी खेळी! फक्त ५.५९ लाखांत लाँच केली नवी ‘पंच’; लूक असा की मोठ्या गाड्याही फिक्या पडतील!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Punch Facelift 2026 Price | जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा! कारण मध्यमवर्गीय भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या टाटा मोटर्सने आपली सर्वात लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही ‘टाटा पंच’ (Tata Punch) चं नवीन फेसलिफ्ट मॉडेल बाजारात उतरवलं आहे. आकर्षक लूक, खिशात मावेल अशी किंमत आणि सुरक्षेचा जबरदस्त भरवसा यामुळे ही गाडी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, या गाडीची सुरुवातीची किंमत अवघी ५.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.Tata Punch Facelift 2026 Price

लूक बघूनच प्रेमात पडाल!

नवी टाटा पंच पाहिल्यावर तुम्हाला टाटाच्याच महागड्या गाड्यांची म्हणजेच नेक्सॉन, हॅरिअर आणि सफारीची आठवण येईल. कंपनीने याच्या फ्रंटला नवीन लायटिंग एलिमेंट आणि पियानो ब्लॅक फिनिश दिलंय, ज्यामुळे गाडीला एक प्रीमियम लूक मिळाला आहे. मागील बाजूला देखील नवीन टेललँप्स आणि रिडिझाइन केलेला बंपर आहे, जो गाडीला रस्त्यावर एक वेगळीच ‘बोल्ड’ ओळख देतो. ही गाडी सहा भन्नाट रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे, ज्यामध्ये कॅरमेल यलो आणि सायंटिफिक ब्लू हे रंग तरुणींच्या आणि तरुणांच्या पसंतीस उतरतील असे आहेत.

सुरक्षेच्या बाबतीत ‘बाप’ गाडी!

टाटा म्हणजे सुरक्षा हे समीकरण आता सगळ्यांनाच माहिती आहे. टाटाने या गाडीची चक्क एका ट्रकसोबत ‘रियल वर्ल्ड क्रॅश टेस्ट’ केली. ५० किमी प्रतितास वेगाने गाडी जेव्हा उभ्या ट्रकला धडकली, तरीही आतील चारही डमी सुरक्षित राहिले. यावरूनच सिद्ध होतं की, ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही तुमच्या कुटुंबासाठी किती सुरक्षित आहे.

फीचर्स पाहून म्हणाल ‘वाह’!

गाडीच्या आत बसल्यावर तुम्हाला एकदम मॉडर्न फील येईल. यात नवीन ‘ट्विन स्पोक’ स्टिअरिंग व्हील दिलंय, ज्यावर टाटाचा चमकणारा लोगो आहे. जुन्या साध्या बटणांच्या जागी आता स्टायलिश टॉगल स्विच आलेत. मनोरंजनासाठी १० इंचाची मोठी इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि ड्रायव्हरसाठी ७ इंचाची डिजिटल स्क्रीन देण्यात आली आहे.

इंजिन आणि सीएनजीचा तडका

टाटा पंचमध्ये आता ३ इंजिनचे पर्याय मिळतील. पेट्रोलसोबतच ज्यांना पेट्रोलचे भाव परवडत नाहीत, त्यांच्यासाठी सीएनजीचा उत्तम पर्याय आहे. टाटाच्या खास ‘ड्युअल सिलिंडर’ टेक्नॉलॉजीमुळे सीएनजी असूनही तुम्हाला डिकीमध्ये (बूट स्पेस) २१० लिटरची जागा मिळते, म्हणजे सामानाची अडचण आता संपली! ही गाडी फक्त ११.१ सेकंदात १०० चा वेग पकडू शकते, जो या सेगमेंटमध्ये खूपच भारी आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!