2100 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार जानेवारीचे पैसे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana KYC Update | भाऊबीजेला ओवाळणी दिली, मकरसंक्रांतीला वाण दिलं, पण आता जानेवारीच्या हप्त्याचं काय?” असा प्रश्न सध्या राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या मनात घर करून आहे. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर खात्यात पैसे जमा झाले खरे, पण जे स्वप्न दाखवलं होतं, ते पूर्ण न झाल्याने महिलांमध्ये थोडी निराशेची लाट पाहायला मिळत आहे.

​दोन हप्ते येणार होते, मग गेम कुठे फिरला?

​गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, जानेवारी महिन्यात महिलांना दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच ३००० रुपये एकत्र मिळणार. खुद्द मंत्र्यांनीही तशी घोषणा केली होती, त्यामुळे महिलांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण संक्रांत आली आणि खात्यात फक्त डिसेंबरचा एकच हप्ता जमा झाला.

​यामागे राजकीय पेच असल्याचं बोललं जातंय. काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून यावर आक्षेप घेतला होता. “महिलांना आगाऊ पैसे देऊ नका,” अशी भूमिका आयोगाने घेतल्यामुळे सरकारला आपले हात आखडते घ्यावे लागले आणि दोन हप्त्याऐवजी फक्त एकच हप्ता बहिणींच्या पदरात पडला.

​आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?

​सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुका असल्या की आचारसंहिता येते आणि सरकारी योजनांचे पैसे थांबतात. सूत्रांच्या माहितीनुसार, आता महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सरकार जानेवारीचा हप्ता खात्यात जमा करण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर न झाल्याने बहिणींची प्रतीक्षा कायम आहे.

​३० लाख महिलांना बसणार मोठा फटका!

​एकीकडे हप्त्याची वाट पाहिली जात असताना दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुम्ही जर अजून ‘KYC’ केलं नसेल, तर पुढच्या वेळी तुमच्या खात्यात एक रुपयाही येणार नाही. राज्यातील तब्बल ३० लाख महिलांनी अजूनही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. नवीन आर्थिक वर्षात ही प्रक्रिया अनिवार्य असेल. त्यामुळे ज्या महिलांची कागदपत्रं अपूर्ण आहेत, त्यांना या योजनेतून डच्चू मिळण्याची भीती निर्माण झाली आहे.

भावाचा शब्द की निवडणुकीचा मेळ?

लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० वरून २१०० रुपये करण्याची घोषणा मंत्र्यांनी केली आहे. पण प्रत्यक्षात हा वाढलेला हप्ता कधी मिळणार आणि जानेवारीची थकबाकी कधी येणार, याकडेच आता तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!