मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; लाभार्थी यादी जाहीर नाव चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana News: राज्यातील सव्वादोन कोटी लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे प्रत्येकी १५०० रुपये, म्हणजेच एकत्रित ३००० रुपये मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन सरकारकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने तब्बल ६७०० कोटी रुपयांचा निधी वित्त विभागाकडे मागितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. Ladki Bahin Yojana News

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही नवी नाही तर ही नियमित सुरू असलेली शासकीय योजना आहे. योजनेच्या शासन निर्णयानुसार दरमहा १० तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू असली, तरी या योजनेचा लाभ वितरित करण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

याआधीही महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेदरम्यान लाभ वितरित झाल्याचे उदाहरणे आहेत. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आचारसंहिता जाहीर झाल्याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच सुमारे पंधरा दिवसांपूर्वी वितरित करण्यात आला. त्यामुळे आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता थांबवण्याचा प्रश्नच येत नाही, असे प्रशासनातील सूत्रांचे मत आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने मतदानापूर्वी लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करू नये, अशी मागणी करत राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर नेमकी काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही जुनी योजना असल्याने आणि ग्रामीण भागात कोणतीही आचारसंहिता नसल्याने लाभ वितरण रोखता येणार नाही.

राज्यातील एकूण २.२३ कोटी लाडक्या बहिणींपैकी सुमारे ९३ लाख महिला शहरी भागातील असून, उर्वरित दीड कोटीहून अधिक महिला ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात सध्या कोणतीही निवडणूक आचारसंहिता लागू नसल्यामुळे तेथील लाभार्थींना हप्ता देण्यास कोणताही अडसर नाही. त्यामुळे संपूर्ण योजनेचा लाभ थांबवणे शक्य नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्ट मत आहे.

दरम्यान लाडक्या बहिणींसोबतच ‘बालसंगोपन योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांनाही दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. अनाथ किंवा एक पालक नसलेल्या मुलांना शासनाकडून १८ वर्षांपर्यंत दरमहा २२५० रुपये दिले जातात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हा लाभ प्रलंबित आहे. लाडकी बहीण योजनेसोबतच या मुलांनाही थकीत रक्कम देण्यासाठी महिला व बालविकास विभागाने वित्त विभागाकडे १०० कोटी रुपयांची पुरवणी मागणी पाठवली आहे.

एकूणच मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता अधिक बळावली असून, शासन पातळीवर हालचाली वेगाने सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आता सर्वांच्या नजरा वित्त विभागाच्या मंजुरीवर आणि अंतिम निर्णयावर खिळल्या आहेत.

हे पण वाचा : मकर संक्रांतीला ‘या’ 5 राशींसाठी सुरू होणार सुवर्णकाळ; सूर्यदेवाच्या कृपेने नशीब बदलणार, पैसा-समृद्धी दारात येणार

Leave a Comment

error: Content is protected !!